10:22pm | Sep 29, 2024 |
सातारा : सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्य बहुजन समाजासाठी पथदर्शी ठरले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले.
सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय व दुदुस्कर कुटुंबीयातर्फे देण्यात येणारा 'रावबहाद्दर संभाजीराव मोरे बुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' २२ महाराष्ट्र एन सी सी बटालियन, साताराचे प्रमुख कर्नल एम. ए. राज मन्नार यांना प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, सचिव मिलिंद घाडगे, खजिनदार आनंद कदम, निलेश दुदुस्कर, संचालक सचिन नलावडे, उमेश मोटे आदि मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या धोरणाचा अंगीकार सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने कायम केला आहे. त्यामुळेच साताऱ्यातील डोंगरदऱ्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली झाली. हीच सामाजीक प्रगतीची वाटचाल भविष्यातही सुरूच राहील याची निश्चित आशा आहे. राजर्षी छ. शाहू महाराजांचा बहुजन हिताचा वारसा रा. ब. संभाजीराव मोरे दुदुस्कर व रूद्राजीराजे महाडीक यांनी पुढे नेला. या विचारातूनच साताऱ्याच्या शैक्षणिक इतिहासात कला व वाणिज्य महाविद्यालयाचे भरीव योगदान आहे. या संस्थेने व महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम अहोरात्र केले आहे. आज संस्थेने कर्नल राज मन्नार यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन लष्करी सेवेचा योग्य सन्मान केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाची मानसिकता ठेऊन लढाऊ बाणा ठेवणाऱ्या योद्यांचा हा गौरव आहे. विद्यार्थ्यांनी अशा देशसेवा करणाऱ्या शूरांचा आदर्श ठेवावा.
सत्कारमूर्ती कर्नल राज मन्नार म्हणाले, विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाचे ध्येय समोर ठेवावे. जिवनात भविष्याची वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी उच्च ध्येयवादी असावे. संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्याची केंद्रे ही शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून आपले ध्येय साध्य करावे. प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा मागची भूमिका त्यांनी सांगितली. ते म्हणाले, संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाची प्रगती होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात कला व वाणिज्य महाविद्यालयाचा नावलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात संस्था व महाविद्यालयाच्या इतिहासाचा व प्रगतीचा आढावा घेतला. कै. शरदराव चव्हाण (काका) यांनी संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट केले. आज महाविद्यालयाच्या इमारतीचा विस्तार व झालेली शैक्षणिक प्रगती हे सर्व काकांच्या स्वप्नांचाच परिपाक आहे. आमच्या संस्थेच्या वतिने देण्यात येणारा हा पुरस्कार समाजातील विविधक्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना दिला जातो. कर्नल राज मन्नार यांची देशसेवेची पराक्रमी कामगिरी ही आदर्शवत असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला.
प्रारंभी सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय व दुदुस्कर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा 'रावबहादूर संभाजीराव मोरे-दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' कर्नल एम. ए. राज मन्नार यांना प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सन्मानचिन्ह असे होते. मानपत्राचे वाचन प्रा. प्रकाश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत जाधव व आभार प्रज्वल दुदुस्कर यांनी मानले. कार्यक्रमास सातारा शहर व परिसरातील नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात महिला परिवर्तन घडवतील |
जीवन विद्या मिशन, मुंबई संस्थेच्या ट्रस्टीपदी चंद्रशेखर चोरगे |
जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू व्हावे |
मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी |
शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव |
जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा |
कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले |
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाठा गटाचा रास्ता रोको |
सातारकर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी |
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली |
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात महिला परिवर्तन घडवतील |
जीवन विद्या मिशन, मुंबई संस्थेच्या ट्रस्टीपदी चंद्रशेखर चोरगे |
जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू व्हावे |
मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी |
शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव |
जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा |
कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले |
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाठा गटाचा रास्ता रोको |
सातारकर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी |
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली |
जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी |
जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियाच्या औषधांचा तुटवडा |
महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख |
नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन |
वाई विधानसभा मतदार संघातील विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन व लोकार्पण |