सातारा जिल्ह्यासाठी 45 हजार 422 घरकुलांचे उद्दिष्ट : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 27 January 2025


सातारा : शासनाच्या 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर या आराखड्यानुसार राज्यामध्ये 20 लक्ष घरकुलांचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. यानुसार सातारा जिल्ह्यासाठी 45 हजार 422 एवढ्या मोठ्या घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

यामध्ये जावली 2579, कराड 6541, खंडाळा 1833, खटाव 4598, कोरेगाव 4146, महाबळेश्वर 1118, माण 3254, पाटण 9279, फलटण 3928, सातारा 5956 व वाई 2190 असे एकूण 45 हजार 422 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

घरकुल बांधकामाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना आहेत. त्यासाठी ग्राम विकास विभाग, पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग व रोजगार हमी योजना विभाग यांच्या अभिसरणातून साधारण 1 लाख 58 हजार 730 इतके अदान देण्यात येते.

ता प्राप्त झालेल्या उद्दिष्टानुसार ४५,४२२ घरकुलांना १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत तात्काळ मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरीत करुन कामे सुरु करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.या योजनेस गती देण्यासाठी मागील आठवड्यात पुणे येथे विभागस्तरावर मी स्वतः आढावा घेतला आहे. इतर जिल्ह्यांनाही सूचना दिल्या आहेत.घरकुलाचा हप्ता वितरीत करताना लाभार्थ्याची कोणतीही आर्थिक पिळवणुक होणार नाही तसेच अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पंचायत समितीच्या दर्शनी भागात या संदर्भाने फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत भुमीहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुलासाठी ५०० चौरस फुट मर्यादेत रुपये १ लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. याचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू
पुढील बातमी
पंधरा मिनिटाच्या आढावा बैठकीत 712 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

संबंधित बातम्या