सातारा : मालमत्ता सील केलेले कुलुप तोडून मिळकतीमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधीर जाधव, विठ्ठल माने, वनिता जाधव (तिघे रा. शहापूर ता.सातारा) यांच्या विरुध्द अजित भगवान सुखदेवे (रा. करंजे, ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १५ सप्टेबर रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.