बिभवीत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीत संसार जळून खाक

by Team Satara Today | published on : 29 December 2025


मेढा : बिभवी, ता.  जावळी  येथे  कदम कुटुंबियांच्या लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.  या आगीत लाखो रूपयाचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. बिभवी ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने व अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून जीवितहानी झाली नाही. मात्र घरात असणाऱ्या दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीमध्ये उभा संसार जळुन खाक झाला आहे.

बिभवी येथील  पांडुरंग शंकर कदम, विठ्ठल शंकर कदम, वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळाराम कदम, प्रभाकर सावळाराम कदम यांच्या घरामध्ये सकाळी ९ वाजता  अचानक पेट घेतल्याने व धुराचे लोट पत्र्यामधून बाहेर पडले.  ग्रामस्थ मंडळींनी बाहेरगावी गेलेल्या कदम कुटूंबातील सर्वांना बोलावून घेतले. अग्नीशमन दलाला फोन तात्काळ बोलावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या सहाय्याने व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बिभवी ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने व अग्निशमन दलाच्या मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून जीवितहानी झाली नसून घरातील सर्व धान्य,कपडे, व इतर साहित्य जळून खाक झाले असून संसार  उघडयावर पडला आहे. प्रशासनाने कुटुंबीयांना शासनाने मदत करावी,  अशी बिभवी ग्रामस्थांची मागणी आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजकुमार साळवे यांनी मांडलेला आशय अतिशय भावस्पर्शी - श्री. छ. वृषालीराजे भोसले; राजकुमार साळवे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन
पुढील बातमी
संविधान समजलेली तरुणाई देशाला दिशा देईल - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे; मालचौंडी येथे श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान

संबंधित बातम्या