नारायणपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवला. यात दोन जवानांना वीरमरण आलं. यातील एक जवान हा साताऱ्यातील होता.
आयईडी बॉम्बच्या स्फोटात 2 आयटीबीपी जवानांना वीरमरण आलं. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजता घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी छत्तीगडमधील बिजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. या नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्राणघातक स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलं. तर दोन पोलिसही गंभीर जखमी झालेत. जखमी जवानांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वीरमरण आलेल्या जवानांमध्ये अमर पवार हे महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी आहेत. तर दुसऱ्या जवानाचं नाव राजेश असं आहे. राजेश हे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील रहिवासी आहेत. दोन्ही जवान आयटीबीपीच्या 53 व्या बटालियनमध्ये होते.
IED स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलंय. या स्फोटात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली. वीरमरण आलेल्या जवानांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबीयांना बळ मिळो, जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी दिली आहे.
नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, दोन जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. "जवानांचं संयुक्त पथक धुरबेरा येथून निघालं होतं. सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान IED चा मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.