डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये स्वच्छता अभियान; सर्व शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ

by Team Satara Today | published on : 04 March 2026


फलटण :   रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने रविवारी फलटण येथील  प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय या सर्व शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला . 

यावेळी या उपक्रमात 11 ट्रॅक्टर च्या मदतीने  सुमारे दहा टन सुका कचरा गोळा करून तो डंपिंग ग्राऊंड या ठिकाणी टाकण्यात आला . रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यत श्रीसमर्थ बैठकीतील   सुमारे सहाशे श्रीसदस्यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला व सर्व शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करून घेण्यात आला. 

 महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे . फलटण विभागातून फलटण - फरांदवाडी , विडणी , नातेपुते इत्यादी ठिकाणच्या श्रीसमर्थ बैठकीतील श्रीसदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून सर्व शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करून घेतला .

गेली कित्येक दिवसांपासून या परिसरात पालापाचोळा, अनेक झाडे झुडपे, गवत वाढून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.  श्रीसदस्यांनी हातात झाडू, खोरे, टिकाव, खुरपे , घमेले, दातुळ घेऊन संपूर्ण परिसराची साफसफाई करून परिसर चकाचक करण्यात आला . 

यावेळी फलटण नगरपालिकेची वाहने तसेच श्रीसमर्थ बैठकीतील श्रीसदस्यांची वाहने यांच्या माध्यमातून गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्यात आला . या एकत्र केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून ते खत प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येते. या उपक्रमांचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतूक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रश्नांवर ६ मार्च रोजी धरणे आंदोलन करणार - चंद्रकांत खंडाईत यांचा इशारा
पुढील बातमी
बुद्धाचे विचार बाबासाहेबांनी संविधानामार्फत दिले : डॉ. जयश्री कांबळे; "धम्म आणि संविधान-मानव मुक्तीचा मार्ग" वर व्याख्यान

संबंधित बातम्या