सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी कुशी, ता. सातारा येथील बाळकृष्ण गुलाब साळुंखे आणि त्यांची आई पार्वती यांना मारहाण केल्याप्रकरणी सुषमा बाळकृष्ण साळुंखे आणि सुरज बाळकृष्ण साळुंखे दोघेही रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 January 2025