सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

by Team Satara Today | published on : 12 October 2024


सातारा : सातारा शहर पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी साईप्रसाद अपार्टमेंट, गोडोली, सातारा येथे आशिष अरुण माने रा. पाटखळ माथा, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 1 हजार 60 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत, लक्ष्मी टेकडी, सदर बाजार येथे तेथीलच उत्तम कल्याण दंडगुले याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून 940 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारकरांनी अनुभवला दसरा सणाचा शाही बाज

संबंधित बातम्या