अंबवडे गावच्या हद्दीत मोटारीच्या २६ हजार ४०० रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 23 March 2026


सातारा : अंबवडे गावच्या हद्दीतील उरमोडी धरण ते कण्हेर धरण जाणाऱ्या कॅनॉलवर असलेल्या मोटारीची २६ हजार ४०० रुपये किमतीच्या तांब्याची चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे.

मोटारीची केबल असलेल्या ७० फूट लांबीचे २२ तुकडे असे एकूण १५४० फूट तांब्याच्या केबलची चोरी करण्यात आली आहे. याची फिर्याद हनुमंत रामचंद्र जाधव (वय ७६ रा. आंबवडे, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंगापूर तर्फ तारगाव येथून १७ वर्षीय युवतीचे अपहरण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद
पुढील बातमी
साताऱ्यात रविवार पेठेतून स्प्लेंडर दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या