एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 December 2024


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वाढे ता. सातारा येथील पुणे -कोल्हापूर महामार्गानजीक असणाऱ्या चहाच्या टपरीवर आकाश बापू भोंग रा. पानगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर. सध्या रा. वाढे, ता. सातारा या युवकाला काही कारण नसताना शाहीर प्रल्हाद मिटकरी आदित्य नारायण कांबळे आणि कांबळे यांचे दोन मित्र (पत्ता माहीत नाही) यांनी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'शहापूर' चा दुसऱ्या सत्रातील पाणीपुरवठा उद्या बंद
पुढील बातमी
मारहाणीत जखमी झालेल्याचा मृत्यू; दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या