कराड : महिनाभरापासून प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार घोणस या विषारी साप दिसत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्पमित्रांनी काल दिवसभरात दोन घोणस पकडण्यात आल्या. त्यातील एक घोणस जखमी असल्याने तिच्यावर सर्पमित्र मयूर लोहाना व सहकाऱ्यांनी उपचार केले.
बागेत गवत कापण्याचे काम सुरू असताना घोणस त्यातून बाहेर आली. गवत कापण्याच्या मशिनमध्ये अडकल्याने ती जखमी झाली होती. पालिका कर्मचाऱ्यांनी त्वरित सर्पमित्र लोहाना यांना बोलावले. त्यांनी ती पकडून तिच्यावर उपचार केले. सायंकाळी उशीरा अआणखी एक घोणस सापडली. महिनाभरापासून आत्तापर्यंत ३० साप येथे सापडले आहेत. त्यात विषारी २३ साप आहेत. त्यामुळे बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावली आहे.
बागेतील गवत काण्यासाठी नवीन मशिनही पालिकेने मागवल्या आहेत. त्यामुळे बागेत वाढलेले गवत नियंत्रणात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली असली, तरी सापांची संख्याही दिसून येत आहे. वन विभागाच्या उपस्थितीत सर्पमित्रांनी सापडलेल्या घोणस सुरक्षितस्थळी सोडल्या आहेत.