02:47pm | Sep 18, 2024 |
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर-पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभ्ाूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या प्रेरणास्थान कै.सौ.कलावती माने यांचा 30 वा पुण्यस्मृतीदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
संस्थेच्या प्रेरणास्थान कै.सौ.कलावती माने यांच्या पुण्यस्मृतीदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या कै.सौ.कलावती माने बालविकास केंद्र, समाजभ्ाूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा, श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली ता. जि. सातारा, न्यू इंग्लिश स्कूल जायगांव ता. कोरेगांव जि. सातारा, या शाखांमधील तसेच संस्थेच्या ध्येय-धोरणाशी सुसंगत कामकाज करणाऱ्या जि. प. प्राथ. शाळा बावची ता. वाळवा जि. सांगली या शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्याच्या कर्तबगार मातांचा ‘‘आदर्श माता-पालक पुरस्कार’’ प्रदान करून डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, डॉ. सौ. अरूणाताई बर्गे तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. पुष्पा जाधव, सहा. सरकारी अभियोक्ता सौ. श्वेता खरे यांच्या शुभहस्ते तसेच कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती भोसले, समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शुभांगी डोर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व साडी चोळीसह सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आपली शासकीय सेवा कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शासनाच्या सामान्य नागरिकांसाठी असणार्या कल्याणकारी लाभांच्या योजना तळागाळापर्यत पोहचवून यशस्वी अंमलबजावणी करणार्या समर्थनगर, संभाजीनगर, कोडोली परिसरातील अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचा ‘‘शिवकला कृतज्ञता पुरस्कार’’ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व साडीचोळी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थापक स्व. शिवराम माने गुरूजी यांच्या पश्चात संस्थेचे सचिव संजीव माने तसेच अतुल माने आणि माने परिवाराने संस्थेची वाटचाल गुरूजींच्या ध्येय-धोरणानुसार सुरू ठेवली असून समाजापुढे आदर्श ठेवणारे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार डॉ. सौ. प्रियाताई शिंदे व डॉ. सौ. अर्चनाताई बर्गे यांनी काढले. पुरस्कार प्राप्त गौरवमुर्ती श्रीम. नम्रता कुडाळकर, सौ. तसलिम इनामदार, सौ. अर्चना गायकवाड यांनी मनोगतातून संस्थेचे आभार मानून संस्थेने आमची केलेली निवड व घेतलेली दखल सार्थ ठरविणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी रक्तदान शिबीरामध्ये अग्रभागी राहून रक्तदान शिबीर विक्रमी व उच्चांकी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे संस्थेचे संचालक व उपशिक्षक सलिम मुलाणी तसेच नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी व निटनेटके आयोजन करणार्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. प्रतिभा जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कै.सौ.कलावती माने यांना पुण्यस्मृतीदिनानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमधून आदरांजली वाहण्यात आली. हार्मिनिअम विशारद शांताराम दयाळ, माणिकराव पवार यांच्या सुश्राव्य भक्तीगीतांच्या कार्यक्रमांनंतर मुख्य कार्यक्रम माने कॉलनी, देगांवरोड, सातारा. या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी संस्था संचालक, हितचिंतक परिसरातील ग्रामस्थ, पालक यांनी उपस्थित राहून कै.सौ.कलावती माने यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पांजली वाहिली. यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास जि. प. साताराचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, पं. स. सदस्य रामदास साळुंखे, अहिल्यानगर ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार माने, संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य जयवंतराव मोरे, दादा तांगडे तसेच बजरंग देशमुख कारंडवाडी, देवीदास मेढेकर, संतोष गायकवाड मौजे कोडोली, समर्थनगर, संभाजीनगर, देगांव, अंगापूर, कुसवडे, चिखली ता. सातारा, जायगांव ता. कोरेगांव गावातील ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा जाधव, प्रास्ताविक संचालिका मनिषा कदम व आभार उपशिक्षिका वैशाली भिसे यांनी मानले.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |