सातारा : अमर रहे, अमर रहे, सुभेदार संजय पवार अमर रहे, अशा घोषणा व साश्रुनयनांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सुभेदार संजय पवार यांना क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.
पानाफुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सुभेदार पवार यांची अंत्ययात्रा माहुलीपर्यंत काढण्यात आली. यावेळी या ट्रॅक्टरला तिरंगा झेंडे लावून देशभक्ती गीत, भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, जब तक सुरज चांद रहेगा, संजय पवार तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात आल्या. येथील रविवार पेठेतील गीते बिल्डिंगमधील रहिवाशी सुभेदार संजय रघुनाथ पवार यांचे आकस्मित निधन झाले. ते २७ वर्षे ५ पॅरा (स्पेशन फोर्स) फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी सुवर्णा, तसेच संगिता सुनिल चव्हाण, सुमन जयवंत जाधव या दोन बहिणी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
सुभेदार संजय रघुनाथ पवार यांना त्यांचे चिरंजीव कुमार प्रथमेश व वडील रघुनाथ पवार यांनी भडाग्नी दिला. यावेळी त्यांची आई इंदुबाई, वडील, पत्नी व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. संजय पवार यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा, मुलगा प्रथमेश व मुलगी वैष्णवी यांच्या हातात तिरंगा झेंडा अर्पण करताना पाच पॅरा फोर्सचे सुभेदार शिंदे यांना अश्रू अनावर झाले.
सुभेदार संजय पवार यांना भडाग्नी देण्यापूर्वी नौसैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, माजी शिक्षण सभापती रामभाऊ हादगे, जनता सहकारी बँकेचे संचालक अविनाश बाचल, तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने एपीआय अविनाश माने, जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने भालचंद्र कुंभार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पाच पॅरा फोर्सच्यावतीने नाईक अमोल शेलार, ज्योतीराम झांजुर्णे, सुनील नलगे, चंद्रकांत खेडेकर, मच्छद्रिं शिंदे व चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्यावतीने नायब सुभेदार रघुराज सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पार्थिवास गार्ड ऑफ ऑनर सातारा पोलीस व ११ जाट रेजिमेंट यांचे तर्फे हवेत गोळीबार करून सलामी दिली. यावेळी संजय पवार यांची बहीण, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |