सातारा : सदर बाजार मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी साडेसहा वाजता सुमारास सुरेश रामस्वामी पेटेकर रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा यांची वीस हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच 11 सीआर 0370 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा