सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहरसह शाहूपुरी पोलिसांनी पाच जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 30 रोजी जुना मोठा स्टॅन्ड परिसरातील कृष्णा टॉकीज च्या शेजारी अनिरुद्ध राजेंद्र जाधव रा. अंबवडे, पोस्ट जकातवाडी, ता. सातारा हा अवैधरित्या ताडी विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 900 रुपये किंमतीची ताडी जप्त करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, अजंठा चौक परिसरातील एका महिले कडून 960 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आले आहेत.
तिसऱ्या घटनेत, बोगदा परिसरातून मयूर अशोक नलवडे राहणार मंगळवार पेठ सातारा याच्याकडून 720 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चौथ्या घटनेत, दत्तनगर कोडोली येथून तेथीलच आत्माराम अण्णा जाधव यांच्याकडून 680 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाचव्या घटनेत, लक्ष्मी टेकडी सदर बाजार परिसरातून तेथीलच विनोद विठ्ठल भांडवलकर यांच्याकडून 960 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.