कराडात 40 हजारांचा गुटखा जप्त

अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई

by Team Satara Today | published on : 07 December 2024


कराड : प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाल्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटखा, पानमसाल्याचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सातारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कराड शहरातील नगरपालिका परिसरात प्रतिबंधीत गुटखा व पानमसाला विकला जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर या पंचांसमक्ष शनिवार पेठेत पालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या गणेश ट्रेडींग कंपनीत गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांनी तपासणी केली असता त्यांना प्रतिबंधीत गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला. गणेश ट्रेडींग कंपनीतून त्यांनी 18 हजार 543 रुपयांचा साठा हस्तगत केला. याबाबत रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश शिवाजी शिंदे (रा. कल्पतरू कॉलनी, कार्वेनाका, कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान शमीर हवालदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय ज्ञानदेव होगले (रा. कल्पतरु कॉलनी, कार्वेनाका, कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मान्याचीवाडी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत
पुढील बातमी
वीजपुरवठा पुरेसा नसल्याने रब्बी हंगामातील पिके वाळली

संबंधित बातम्या