सातारा : संगमनगर येथील रस्त्यावर रविवारी ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दिशा घोरपडे या युवतीचा मृत्यू झाला. यानंतर घोरपडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असतानाच त्यांना आणखी धक्का सहन करावा लागला. दिशाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजोबा दत्तात्रय मारूती शिंदे (वय 50 रा. सोनगाव सं. निब ता. सातारा) यांनीही प्राण सोडला. त्यांचे दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराने निधन झाले.
सातारा–कोरेगाव रस्त्यावर संगमनगर येथे दिशाला ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. दिशा ही दत्तात्रय शिंदे यांच्या सख्ख्या चुलतभावाच्या मुलीची मुलगी होती. दिशा वारंवार आजोळी सोनगाव येथे येत होती. शनिवारी ती आल्यानंतर दत्तात्रय शिंदेंनाही भेटली होती. दिशा त्यांच्यासह सर्वच कुटुंबाची लाडकी होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे आजोळही शोकसागरात बुडाले. दिशावर शिरढोण या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दत्तात्रय शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दिशा आजी व आजोबांकडे नेहमी वास्तव्यास असायची. घोरपडे व शिंदे कुटुंबावर कोसळलेल्या हृदयद्रावक प्रसंगांमुळे सोनगाव व शिरढोण या गावावर शोककळा पसरली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |