साताऱ्यात गर्दी जमवून मारामारी केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 07 March 2026


सातारा : सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या समोर गर्दी जमवून मारामारी केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नील तानाजी बडेकर, निखिल रोहित वायदंडे, आकाश निवृत्ती राऊत( सर्व रा. रविवार पेठ,सातारा) आणि यशवर्धन हितेश सिंग (रा. सदर बाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. चौघांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांना हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केल्याचे पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन आदमाने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार त्रिंबके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फोनवर कोणाबरोबर बोलत आहे असे विचारल्याने पतीच्या डोक्यात पत्नीने घातले लाटणे
पुढील बातमी
कराड तालुक्यातील उंडाळे येथे मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

संबंधित बातम्या