दुचाकी चोरल्यानंतर केवळ चार तासांत चोरटा जेरबंद

सातारा तालुका डी.बी. पथकासह बोरगाव पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 24 February 2025


सातारा : आरळे ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासात पोलिसांनी संशयिताला अटक करुन चोरीची दुचाकी जप्त केली. ही कारवाई सातारा तालुका व बोरगाव पोलिसांनी केली.

यरामचंद्र विश्वास जाधव (वय 36, रा.डोळेगाव पो.वेचले ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सचिन बबन चव्हाण (रा. आरळे ता.सातारा) यांनी आरळे गावचे हददीतील कृष्णा नदीकाठ परिसरातून त्यांची एमएच 11 डीक्यु 8489 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याबाबतचा तालुका गुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलीस तपास करत असताना संशयिताची माहिती पोलिसांना मिळाली व तो नागठाणे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांना याची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली. बोरगाव पोलिसांनी परिसरात धाव घेवून पाहणी केली असता संशयित दुचाकीसह सापडला व त्याला ताब्यात घेतले.

पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धोंडिराम वाळवेकर, सपोनि विनोद नेवसे, पोलीस मोनाली बोराटे, रामचंद्र गोरे, दादा स्वामी, राजू शिखरे, प्रदिप मोहिते, संदिप पांडव, धीरज पारडे, सुनिल कर्णे, दिपककुमार मांडवे, केतन जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी
पुढील बातमी
तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या