सातारा : सातारा एमआयडीसीत एका कंपनीत काम करणारा दलित समाजातील राजाराम कुचेकर याच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बैठे आंदोलन केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराकडे वळवला. तोच काही अंतरावर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राजाराम कुचेकर आणि संदीप जाधव या दोघांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. तेथे त्यांनी बैठक मारून सातारा शहर पोलिसांनी राजाराम कुचेकर यांच्यावर टाकण्यात आलेला खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान तेथून ते दोघे उठले. त्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घराच्या दिशेने आंदोलन करण्याच्या इराद्याने निघाले. ही बाब सातारा शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाच्या कर्मचारी गणेश जाधव यांना माहिती कळवली. यानंतर त्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच राजाराम कुचेकर आणि संदीप जाधव या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत संदीप जाधव आणि राजाराम कुचेकर या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या समोरील आंदोलकास पोलिसांनी घेतले ताब्यात
by Team Satara Today | published on : 09 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा