सातारा : येथीलनगरवाचनालयमध्ये वाचन कक्षात वाचकवर्ग मोठ्या संख्येनी शांततेत वाचन करीत असतात.मात्र,व्यंगात्मक कोण कृती करीत असेल ? तर त्यास आळा घालणे गरजेचे आहे. तरच वाचनसंस्कृतीला वाचनामुळे बळकटी येईल.तेव्हा सम्बधितांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. अथवा, सीसीटीव्ही पाहुन संबंधितावर कार्यवाही करावी. अशा आशयाचे निवेदन देऊन सविस्तर अशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शांत वातावरणात वाचकवर्ग वाचन करीत असतात. त्यादरम्यान मोठ्याने बोलणे/मोबाईलचा वापर करणे, व्यंगात्मक बोलणे/कृती करणे.असे नानाविध प्रकार राजरोसपणे काहीजण करतात. मात्र, जे प्रामाणिक वाचकवर्ग असतात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्यंग करणारे फक्त वाचण्याच्या बहाणा करून वाचन कक्षात येतात.तेव्हा वाचनात अडथळा निर्माण करण्यावर निर्बंध घालावा.
"सीसीटीव्हीच्या कक्षात आहात.तेव्हा कोणत्याही प्रकारचे व्यंगात्मक कृती करता कामा नये."अशा आशयाचे फलकही लावावेत.शिवाय, सीसीटीव्हीद्वारे रोजच्या रोज पाहणी करावी. अर्थात, कार्यवाही होणे गरजेचे आहे.तरच खऱ्या अर्थाने पायबंद बसु शकेल.अशा आशयाचे निवेदन श्री.छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयचे अध्यक्ष अजित कुबेर यांना अनिल वीर यांनी सादर केले. यावेळी ज्येष्ट संचालिका सौ. वैद्यही कुलकर्णी, संचालक,ग्रंथपाल रुपाली मुळे, कर्मचारी वर्ग व वाचक उपस्थीत होते.