सातारा : खटाव येथील पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये गर्दीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन अनेक महिलांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार घडला याप्रकरणी जयश्री अनिल जगताप (वय 50, रा. पुसेगाव ता. खटाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जयश्री जगताप यांच्या मैत्रीण रोहिणी कुंभार तसेच सुरेखा जाधव व छकुली गुंजवटे या सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव मध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र त्याला दोन सोन्याच्या वाट्या असे अध्यात चोरट्याने लांबवले तसेच फिर्यादीच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम भरण्याचे छोटे मंगळसूत्र सुद्धा या गरजेचा फायदा घेऊन लांबून आले तसेच रोहिणी कुंभार यांचे 15000 रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने हातोहात लांब पास केले सुरेखा सुधीर जाधव यांच्याही गळ्यातील पंधरा ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे या सर्व चोऱ्यांचा तपास पुसेगाव पोलीस करत असून सहायक फौजदार एस के बर्गे अधिक माहिती घेत आहेत.