सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात नोकरी करणार्या महिलेचा पाठलग करुन ’माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत बोल’, असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी घनशाम कुंभार (रा. आंबेदरे ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑक्टोबर 2024 पासून एप्रिल 2025 या कालावधीत संशयिताने वेळोवेळी पाठलाग केला आहे. तक्रारदार महिला ही नोकरदार आहे. तसेच तक्रारदार महिलेची दुचाकी फोडून 4 हजार रुपयांचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.