10:49pm | Dec 04, 2023 |
सातारा : अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसने जिल्हा रुग्णालयात सोमवारी स्वच्छता मोहिम राबवून अनोखी गांधीगिरी केली. सरकारी आस्थापनांमध्ये चतुर्थ श्रेणी कामगारांच्या न होणारी भरती आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या मोहिमेत ४५ कामगार सहभागी झाले होते. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांना निवेदन सादर करण्यात आले.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने सकाळच्या सत्रात कामगारांचे प्रबोधन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्या आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे येथील स्वच्छता होत नसल्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने वारंवार कर्मचारी भरती संदर्भात मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले आहे.
त्यामुळे आज सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू सोलंकी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारूडा यांनी सफाई कर्मचारी तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या समवेत संपूर्ण जिल्हा रुग्णालयाची स्वच्छता मोहीम करून गांधीगिरीने शासनाला व जिल्हा रुग्णालयाला या ठिकाणी तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |