सातारा : बेदरकारपणे, विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकी चालवण्याचा परवाना नसताना सार्वजनिक रस्त्यावर दुखापत होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी अमर तानाजी जाधव (वय 24, रा. वेणेगाव ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 3 जुलै रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.