सातारा पोलिसांचा व्हॉलिबॉल स्पर्धेत डंका

by Team Satara Today | published on : 03 March 2025


सातारा : ठाणे येथे सुरु असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेतील व्हॉलिबॉल स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या टीमने विजय मिळवून सुवर्ण पदकावर कब्जा केला. यामध्ये सातारा वाहतूक विभागाचे पोलिस योगेश जाधव यांना उत्कृष्ट खेळाडू (बेस्ट प्लेअर ऑफ टूर्नामेंटने) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

ठाणे येथे सुरु असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत दि. २८ रोजी व्हॉलिबॉल स्पर्धा झाल्या. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्र व ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र या संघाची विजेतेपदासाठी लढत झाली. यात कोल्हापूर परिक्षेत्राने जबरदस्त कामगगिरी करत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत सातारा ट्रॅफिकचे पोलिस योगेश जाधव यांना प्लेअर ऑफ द टूर्नामेंटने सन्मानित करण्यात आले. २१ वर्षानंतर सातारा पोलिसाचे नाव यावर कोरले गेले आहे. या स्पर्धेसाठी पोलिस योगेश जाधव यांनी वर्षभरात कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा घेतली नाही. आपले कर्तव्य पार पाडून त्यातून वेळ भेटेल तसा सराव करून हे यश मिळवले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरटीई प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ
पुढील बातमी
बांधकामावरुन सेट्रिंगच्या प्लेटा चोरी केल्याप्रकरणी एकास अटक

संबंधित बातम्या