12:49pm | Sep 28, 2024 |
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्याचे आदेश बंगळुरूच्या (Bengaluru) विशेष न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. बंगळुरूतील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयानं ही एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं दिलेले हे आदेश इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीच्या आरोपांसंदर्भात देण्यात आला आहे. जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी निर्मला सीतारामन आणि इतरांविरोधात वैयक्तिक तक्रार (पीसीआर) दाखल केली होती. पीसीआरमध्ये इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीचा आरोप करण्यात आला होता. याचप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
बंगळुरूच्या विशेष कोर्टाकडून आदेश :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यालक एफआयआर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिले आहेत. हे आदेश 42 व्या एसीएमएम कोर्टानं जारी केले आहेत. टिळक नगर पोलीस आता निर्मला सीतारामन आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करणार आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारनं 2018 मध्ये निवडणूक रोखे म्हणजेच, इलेक्टोरल बाँड योजना सुरू केली होती. याचा उद्देश राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या रोख देणग्यांची जागा घेणं हा होता. राजकीय पक्षांच्या निधीमध्ये पारदर्शकता सुधारली जावी. राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून निधी दिला जात होता. मात्र, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, त्यानंतर विरोधकांनी केलेले आरोप आणि याचिका पाहता सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केले आहेत.
इलेक्टोरल बाँड म्हणजे काय?
इलेक्टोरल बाँड ही एक प्रॉमिसरी नोट असते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या निवडक शाखांमध्ये ही प्रॉमिसरी नोट किंवा बाँड मिळतात. 1000 रुपये, 10 हजार रुपये, 1 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 1 कोटी रुपयांच्या पटीत हे बाँड विकले जातात. या योजनेअंतर्गत दिलेल्या देणग्यांवर 100 टक्के करसवलत मिळते. भारतातील कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी हे बाँड खरेदी करू शकते. आपल्या आवडत्या राजकीय पक्षांच्या नावे हे रोखे ट्रान्सफर करण्याची मुभा नागरिक किंवा कंपन्यांना देण्यात आली होती. बँक आणि लाभार्थी राजकीय पक्षाकडून देणगीदारांची ओळख गोपनीय ठेवली जाते.
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात महिला परिवर्तन घडवतील |
जीवन विद्या मिशन, मुंबई संस्थेच्या ट्रस्टीपदी चंद्रशेखर चोरगे |
जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू व्हावे |
मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी |
शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव |
जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा |
कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले |
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाठा गटाचा रास्ता रोको |
सातारकर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी |
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली |

जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी |
जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियाच्या औषधांचा तुटवडा |
महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख |
नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन |
वाई विधानसभा मतदार संघातील विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपुजन व लोकार्पण |