सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील कोषागार कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी (एमएच 11 एजी 3781) अज्ञात चोरट्याने दि. 19 रोजी चोरुन नेली. याबाबत महंमद शरीफ नजीर शेख (वय 40, रा. विकासनगर, खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत, येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हुंडाई शोरुमच्या पार्किंगमधील दुचाकीची (एमएच 11 सीपी 6688) अज्ञाताने दि. 17 रोजी चोरी केली. याबाबत महेश महादेव माळी (वय 29, रा. कोंडवे, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक बोराटे तपास करत आहेत.