आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 September 2024


सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांनी मंडळासमोर प्लाजमा बिम लाईट लावण्यास प्रतिबंध केला असताना संबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष लक्ष्‍मण निकम रा. बोरखळ ता. सातारा, कैलास सिद्धया भंडारे रा. सदर बाजार सातारा, ओंकार संजय कवठेकर रा. रविवार पेठ सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी

संबंधित बातम्या