सातारा : भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा उमेदवार असेल आणि त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते , पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या महायुतीच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन केल्या जातील परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखतीसाठी 17 आणि 18 जानेवारी या दिवशी हॉटेल लेक व्ह्यू, गोडोली, सातारा. या ठिकाणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता , कोरेगाव तालुका. सकाळी 11 वाजता, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुका. दुपारी 12 वाजता, वाई तालुका. दुपारी 1 वाजता, फलटण तालुका. दुपारी 3 वाजता , माण तालुका. दुपारी 4 वाजता खटाव तालुका. याप्रमाणे मुलाखती होतील आणि रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता, सातारा तालुका. दुपारी 12 वाजता , जावळी तालुका. दुपारी 1 वाजता , पाटण तालुका. दुपारी 3 वाजता, कराड तालुका. याप्रमाणे मुलाखती होतील
या मुलाखती घेण्यासाठी सातारा जिल्ह्याची सर्वसमावेशक अशी एक समिती भारतीय जनता पार्टीतर्फे तयार करण्यात आली आहे, या समिती मध्ये नामदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा निवडणूक प्रभारी , नामदार जयकुमारभाऊ गोरे , खासदार श्री छ उदयनराजे भोसले , आमदार डॉ अतुलबाबा भोसले जिल्हाध्यक्ष , आमदार मनोजदादा घोरपडे , रणजीत सिंह नाईक निंबाळकर माजी खासदार, धैर्यशील दादा कदम जिल्हा निवडणूक प्रमुख, विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष, सुनीलतात्या काटकर महायुती समन्वयक, मदनदादा भोसले माजी आमदार व नेते वाई विधानसभा , सौ. प्रियाताई शिंदे नेत्या कोरेगाव विधानसभा, सत्यजित पाटणकर नेते पाटण विधानसभा , रामकृष्ण वेताळ प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा , अमोल मोहिते, नगराध्यक्ष,सातारा, समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष फलटण, अनिल सावंत, नगराध्यक्ष, वाई, तेजस सोनावले, नगराध्यक्ष, मलकापूर , अविनाश कदम निवडणूक प्रमुख सातारा विधानसभा ,विक्रम पवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी, आपापल्या तालुक्याच्या वेळेप्रमाणे उपस्थित राहावे. येताना उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरून सोबत आणावा. तसेच राखीव जागेच्या इच्छुकांनी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र, अर्जासोबत जोडावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले vयांनी केले आहे.