सातारा बसस्थानक परिसरात पाटण तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा  : सातारा मध्यवर्ती बसस्थानक येथे नारायण अण्णा शेलार (वय ७० रा. कोंजवडे,  ता. पाटण) हे बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळून आले. बसस्थानक चौकीचे इंचार्ज अमित चिकणे यांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत असताना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दि ११ रोजी रात्री ३ वाजता दाखल केले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा पवार यांनी तपासून मयत झाल्याचे पोलिसांना कळविले. या प्रकरणी पोलीस हवालदार सपकाळ अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीने रिलेशनशिप तोडल्याने तिच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण; युवकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा येथील सोमवार पेठेत राधाकृष्ण मंदिरातील देवाच्या दागिन्यांची चोरी

संबंधित बातम्या