सातारा : जबरी चोरी प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी युवकांनी संदीप विजय लोहार (वय 29, रा. पाटण) यांना ’कट का मारला,’ असे म्हणत अज्ञात दोघांनी रोख 300 रुपये मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना दि. 1 ऑक्टोबर रोजी घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.