सातारा : सातारा जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत सन 2001 साला पासून मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील उघड्यावरील हागणदारीचा मार्गी लागला आहे. 100% कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय सुविधा निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील ग्रामस्थ शौचालय सुविधेचा वापर करत असलेले दिसून येत आहे, यामुळे आरोग्यमान सुधारले आहे. सध्या जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यावर अभ्यास करण्यासाठी राजस्थान सरकारची मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांची टीम सातारा जिल्हा दौऱ्यास आलेली होती. खंडाळा तालुक्यात 2 ठिकाणी उभारण्यात आलेले हे प्रकल्प पथदर्शी आहेत. याचा आदर्श घ्यावा. असे प्रकल्प गावागावात होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राजस्थान मधील अलवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव साळुंखे यांनी केले.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ आणि विंग ग्रामपंचायतीने उभारलेल्या सांडपाणी व घनकचरा प्रकल्पची पाहणी करण्यासाठी राजस्थान राज्यातील अलवर, भरतपूर, गगननगर येथील अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
ग्रामपंचायत विग व शिरवळ ता. खंडाळा येथे सांडपाणी प्रकल्प व घनकचरा प्रकल्पची पाहणी पथकात गौरव साळुंखे (भारतीय प्रशासकीय सेवा) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलवर, गिरीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गगन नगर, तसेच रमेश कुमार मदन, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद गगन नगर, नंदकुमार लखीवाल, कार्यकरी अभियंता जि. प. अलवर या सर्वांचे स्वागत सातारा जिल्हा परिषद येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातारा जिल्ह्यात राबवत असलेल्या सर्व योजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात स्वच्छतेच्या दृष्टीने चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल गावडे व स्वछता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले, मुख्य व लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, समाज कल्याण अधिकारी विद्याधर चल्लवर, उपस्थिती होते.
सदर पथकाने ग्रामपंचायत विंग येथील सांडपाणी व्यवस्थापनाच्या (एसटीपी) प्रकल्पाची पाहणी केली. गावातील सर्व सांडपाणी एकत्रित करून त्याचे शुद्धीकरण केले जाते व ते पाणी बाग बगीचेला वापरले जाते. हा प्रकल्प पाहून त्यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी सरपंच स्वप्निल तळेकर उपसरपंच पूनम तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण पडळकर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राप कर्मचारी, बचत गटातील महिला, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते महाबळेश्वर तालुक्यातील गावातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी क्षेत्र महाबळेश्वर व गुरेघर ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजय विभुते, तालुका समन्व्यक विशाल घाडगे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव काळे, प्रशांत रणपिसे, महेश बावळेकर, उप सरपंच महादेव ओबळे उपस्थिती होते.
तसेच सदर अभ्यास पथकातील सदस्यांनी विंग व शिरवळ तालुका खंडाळा येथील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श प्रकल्प भेट दिली. यावेळी मा. श्री अनिल वाघमारे गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा सहाय्यक गटविकास अधिकारी श्री प्रकाश बोंबले उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा श्री लाड साहेब, जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे. अजय राऊत, राजेश भोसले, विस्तार अधिकारी सुनील बोडरे, बी आर सी अतुल गायकवाड, सीमा गायकवाड शिरवळचे सरपंच रवींद्र दुधगावकर, उपसरपंच अमोल कबुले, प्रकाश परखंदे, राहुल तांबे, संग्रामसिंह देशमुख, विंगचे सरपंच स्वप्निल तळेकर, रोहीणी महांगरे, वंदना कदम, नीता चव्हाण, दत्तात्रय मानकर, ग्रामपंचायत अधिकारी बबनराव धायगुडे, लक्ष्मणराव पडळकर,उपस्थित होते.