09:15pm | Dec 05, 2023 |
सातारा : सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावरील संगमनगर ते माहुली परिसर दरम्यान झालेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे आहे. तसेच येथील मार्गावर एकोणीस वर्षीय युवतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ माहुली परिसरातील सुमारे अडीचशे नागरिकांनी सातारा-पंढरपूर महामार्ग मंगळवारी दोन तास रोखून धरला. यामुळे राज्य महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.
आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी पहिल्या अर्ध्या तासात उपस्थित नव्हता. सरते शेवटी प्रांत सुधाकर भोसले यांनी माहुली ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारत या संदर्भात तातडीने बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले.
सातारा-पंढरपूर महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हैद्राबाद येथील कंपनी मेघा इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आले आहे. हे काम गेल्या चार वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते माहुली यादरम्यानच्या रस्त्याचे काम झाले असले तरी संगम माहुली परिसरातील महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान दिशा घोरपडे या युवतीचा येथील महामार्ग परिसरात स्पीड ब्रेकर वर गाडी आदळून दुर्दैवी अपघात झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ माहुली ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी दोन तास पंढरपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.
संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे व सदोष बांधकाम करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिस्थिती अडचणीची बनली होती. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शहर पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. सरते शेवटी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांत सुधाकर भोसले घटनास्थळी दाखल झाले. या प्रश्नासंदर्भात तातडीने बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ग्रामस्थांनी मात्र तोंडी आश्वासने नको लेखी आश्वासन द्या आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी जोरदार मागणी केली. वाहतूक पोलिसांनी आंदोलनानंतर येथील महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र सुमारे दीड तास वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |