सातारा : छत्रपती शाहू स्टेडियम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी वैयक्तिक खेळ प्रकारात उज्वल यश संपादन करीत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला.
यामध्ये वैदेही जाधव हिने १४ वर्षे वयोगटात उंच उडी क्रीडा प्रकारात तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला तर १७ वर्षे वयोगटात समिक्षा गडकरी हिने ४०० मीटर हर्डल्स प्रकारात द्वितीय क्रमांक तसेच १०० मीटर हर्डल्स प्रकारात चतुर्थ क्रमांक संपादन केला.वैभवी दोशी हिने तिहेरी उडी प्रकारात द्वितीय क्रमांक, शिवानी सुतार हिने उंच उडी क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
तसेच,१४ वर्षे वयोगटात वेदांत कांबळे याने उंच उडी क्रीडा प्रकारात द्वितीय तर हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला तर १७ वर्षे वयोगटात आयुष भुवड याने उंच उडी क्रीडा प्रकारात द्वितीय,साहिल पवार याने थाळी फेक या खेळात चतुर्थ तसेच भालाफेक मध्ये चतुर्थ क्रमांक व अनिकेत केळघणे याने तिहेरी उडी क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय बारंगळे व अभय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व खेळाडूंसह मार्गदर्शक शिक्षकांचे एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भारत भोसले यांचे शुभहस्ते न्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी शालाप्रमुख प्रविण दीक्षित,सहशिक्षक एन.ए.कांबळे,एम.आर.जाधव,सौ.प्रतिभा साळुंखे,सी.जी.देशमुख,जी.जे.देसाई, मृणाल भोसले,डी.डी.कुचेकर,पी.ए.भोसले व विद्यार्थी वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.