मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 07 April 2025


सातारा : कोडोली येथे छेडछडीच्या कारणातून युवकांनी एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना रविवारी रात्री घडली असून याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, चाकू हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलीचा भाउ जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एक युवक तिच्या ओळखीचा होता. मात्र तो आणखी एका युवतीसोबत बोलत असल्याने मुलीने संबंधित युवकासोबत बोलणे टाळले. यातून संशयित युवकाने मुलीला मारहाण करत छेडछाड काढण्यास सुरुवात केली. यातून मुलीच्या कुटुंबियांनी युवकाला समजावले. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. यातून रविवारी पुन्हा अल्पवयीन मुलीचा भाउ संशयित युवकाला समजावण्यासाठी गेला होता. त्यावेळी वादावादी होवून चाकू सारख्या धारदार शस्त्राने हल्ला झाला.

दुसर्या तक्रारीत युवकाने असे म्हटले आहे की, तो मित्रासोबत हॉटेलमध्ये बसला असताना अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी येवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका संशयिताने एअर गन काढून धमकावले. यावेळी संशयितांनी हॉटेलची तोडफोड करुन गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने घेवून गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भरधाव डंपरची दुचाकीस धडक; एक जखमी
पुढील बातमी
सातारा आरटीओच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या