सातारा : युवतीचा विनयभंग करून तिला दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीच्या एक्टिवा गाडीला पल्सर गाडी आडवी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश संदीप कणसे रा. संभाजीनगर, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.