सातारा : दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे लाखभराची रोकड लंपास केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 ते 26 जानेवारी दरम्यान राधिका रोड वरील सिटी वाईन शॉप नावाच्या दारू दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटून दुकानातील सुमारे लाखभराची रोकड लंपास केल्याची फिर्याद आकाश बाचल रा. सदर बाजार, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करीत आहेत.