गृहिणींना दिलासा लसूणच्या किंमतीत घट

by Team Satara Today | published on : 08 March 2025


नवी मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून लसणाची फोडणी प्रचंड महागली होती. परंतु, मार्केटमध्ये लसणाची आवक वाढल्यामुळे आता भाव निम्म्यावर आले आहेत. किरकोळ बाजारात 400 रुपये किलोने असलेल्या लसणाच्या किंमतीत घट झाली असून 100 ते 200 रुपयांनी लसूण स्वस्त झाला आहे. त्यामुळे गृहिणींना याबाबात दिलासा मिळाला आहे. सध्या लसणाच्या दरात घट झाल्याने बाजारात घाऊक किंमतीने 50 ते 120 रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

लसणाचे सर्वसाधारण दर हे 50 ते100 आणि100 ते150 रुपये किलो असेच असतात. मात्र तीन वर्षा पूर्वीपासून हे दर सातत्याने वाढत होते. मुळात लसणाची लागवड कमी झाल्याने उत्पादन कमी यायला सुरुवात झाली. मात्र बाजारात लसणाला मोठी मागणी असल्याने मागणी इतका पुरवठा बाजारात होत नव्हता. त्यामुळे मागणी पुरवठ्याचे गणित बिघडले आणि लसणाचे दर वाढायला सुरुवात झाली. 200 रुपये किलोपासून हे दर वाढत वाढत400 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे लसणाची फोडणी देणे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. या वाढत जाणाऱ्या दरामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत होती.

याचपार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासून बाजारात नव्या लसणाची आवक सुरू झाली आहे. लसणाला चांगला दर मिळत असल्याने गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची लागवड केली. त्यामुळे आता बाजारात चांगला लसूण येत आहे. लसणाची मोठी आवक मध्य प्रदेश इंदोर मधन होत आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणात लसूण उपलब्ध बाजारात मोठ्या चांगलीच राहणार आहे. आवक चांगली राहणार असल्याने दर ही स्थिर राहणार आहेत. यावर्षी लसणाच्या दरात वाढ होणार नाही असेच चित्र सध्या बाजारात आहे. मे महिन्या पर्यंत दर असेच स्थिर राहिले जातील. त्यानंतर लसनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

बाजारात चायना लसूणही मोठ्या प्रमाणात बाजारात चायना लसूणही मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे आता बाजारात मागणी पेक्षाही दुप्पट लसूण उपलब्ध आहे आणि त्यामुळेच लसणाचे दर खाली आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लसूण घाऊक बाजारात 30 ते 60किलो होता. मात्र मार्च महिन्यात थोडा दर वाढला असून, चांगल्या प्रतीचा लसूण 120 तर आकाराने लहान व ओला लसूण 50 रुपये किलो झाला आहे. तर टेम्पोमधून ठिकठिकाणी विक्री होणारा लसूण 100रुपयाला दीड किलो मिळत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक
पुढील बातमी
जागतिक महिला दिनानिमित्त 'चंडिका' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

संबंधित बातम्या