पाटण : काँग्रेस पक्ष आता आक्रमक भूमिकेत उतरला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा झेंडा उभा राहणारच. पाटण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस विजयी ठरेल, हा आमचा ठाम निर्धार आहे. आपल्याला जनतेशी थेट संपर्क साधून विकासाचा पर्याय म्हणून काँग्रेसची भूमिका लोकांसमोर मांडायची आहे, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष डॉ. संतोष भाऊ कदम यांनी केले.
पाटण येथे तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांतील संघटन रचना, सदस्य नोंदणी, युवक व महिला आघाडीचा सहभाग, तसेच आगामी निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसाठी पुणे येथून प्रदेश काँग्रेसतर्फे तालुका निरीक्षक म्हणून सचिन आडेकर उपस्थित होते.
निरीक्षक आडेकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे हे काळाचे आव्हान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी संवाद साधत पक्षाचे धोरण आणि कार्य याची माहिती पोहोचवावी. पाटण तालुका काँग्रेस लवकरच अधिक भक्कम स्वरूपात उभी राहील, असा त्यांचा विश्वास आहे.
बैठकीस माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, सेवादल अध्यक्ष आनंदराव नांगरे, युवक अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, कोयना विभाग अध्यक्ष रवींद्र कांबळे, अॅड. विक्रांत बडेकर, प्रदीप यादव, भरत मोहिते, सौ. लता कांबळे, तसेच विश्वराज पेटकर, सुनील गायकवाड, रेखा चव्हाण, पूनम माने, दीपक कदम, प्रकाशन कांडीयान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी पाटण तालुका काँग्रेसकडून “संघटनभक्कमविजय निश्चित” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.