सातारा : सदरबझार येथील विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती महेश रमेश सपकाळ, सासू रेश्मा रमेश सपकाळ, सासरे रमेश सुर्यकांत सपकाळ (सर्व रा. धनगरवाडी, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत कोमल महेश सपकाळ (रा. सदरबझार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सासरच्या लोकांनी वारंवार शिवीगाळ-दमदाटी करून मानसिक व शारिरीक छळ केला तसेच मुलीला आई-वडीलांच्या राहत्या घरातून घेऊन गेले असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सावंत तपास करत आहेत.