सातारा : वाळू ठेक्याच्या आमिषाने एकाची सुमारे 43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2019 ते 2022 दरम्यान विवेक उदय फाळके रा. डबेवाडी, ता. सातारा. सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा यांच्याकडून वाळू ठेक्याच्या आमिषाने 43 लाख 20 हजार रुपये घेऊन त्यांना वाळूचा ठेका न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर जाधव, हृदयनाथ सोनवणे दोन्ही रा. सातारा, गोविंद पवार रा. तेग्गीतांडा ता. बेळगी जि. बागलकोट कर्नाटक, रमेश राठोड रा. नागराज तांडा ता. बेळगी जि. बागलकोट कर्नाटक, श्रीसाल गौडा रा. नगराळ ता. बेळगी जि. बागलकोट कर्नाटक या पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.