सातारा : वडूज पोलिसांनी सीआयएसआर पोर्टलच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा आणि परत जिल्ह्यातून केलेला तपास यामुळे वडूज पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातून गहाळ झालेले 24 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळालेले आहे. हा मुद्देमाल तब्बल चार लाख बत्तीस हजार रुपयांचा आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वडूज पोलिसांना गहाळ मुद्देमालाच्या संदर्भाने तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस हवालदार शिवाजी खाडे,गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे या पथकाला याबाबत सूचना दिल्या. या पथकाने तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून मोबाईल धारकांची वारंवार संपर्क करून विशेष तपासणी मोहीमध्ये 24 मोबाईल हस्तगत केले. कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल मूळ मालकांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमध्ये पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, प्रियंका पवार यांनी भाग घेतला होता.