सातारा : तामजाईनगर येथे अज्ञात चोरट्यांनी 72 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तामजाईनगर, सातारा येथे चोरट्यांनी घरफोडी करुन 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 27 जानेवारी रोजी घडली आहे. चोरट्यांनी लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह असता मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी अमोल लालासाहेब दुबळे (वय 32, तामजाईनगर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.