मुंबई : मुंबईच्या फ्रँचायझीने रोहित शर्माकडून नेतृत्व काढून हार्दिककडे सोपवल्यानंतर चाहते प्रचंड संतापले. रोहित या निर्णयाने नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात हार्दिकनेही पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार झाल्यानंतर रोहितशी बोलणं झालं नसल्याचे कबुल केले. त्यामुळे नेमकं काहीतरी फिसकटलंय असे चाहत्यांमध्ये ठाम मत झाले. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे कॅम्पही लागले, परंतु त्यातही रोहित-हार्दिक एकत्र दिसले नाही, त्यामुळे चर्चांना वेग पकडला. पण, अखेर बुधवारी मुंबई इंडियन्सचे पोस्ट केलेल्या व्हिडीओतून याचे उत्तर मिळाले.
मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग कॅपचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यात दोन्ही खेळाडू एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडिओने एक गोष्ट स्पष्ट केली की रोहित आणि हार्दिक हे जुने मित्र आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. हार्दिकने रोहितला पाहताच पुढे येऊन त्याला मिठी मारली. यानंतर दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलत होते.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४सीझनच्या आधी अहमदाबादला जाण्यापूर्वी त्यांचा सराव सामना बंद दाराआड केला होता. मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सराव सामन्यासाठी उद्दिष्टे मांडली होती आणि खेळाडूंना त्यांच्यात्यांच्या भूमिका समजावून सांगितल्या होत्या. रोहित शर्मा एका कस्टमाईज प्रशिक्षण कार्यक्रमात असल्याने तेथे तो गेल्या ३ दिवसांपासून सिम्युलेटेड नेट सत्रे, गतिशीलता आणि स्ट्रेंथ व कंडिशनिंग सत्रांमध्ये सहभागी झाला होता.
मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद
मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक :
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |