नवरात्र उत्सवाची साताऱ्यामध्ये जल्लोषात सांगता; बारा तासाच्या विसर्जन मिरवणूकानंतर आदिशक्तीना निरोप

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा : गेल्या दहा दिवसापासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी शुक्रवारी पहाटेपर्यंत जंगी विसर्जन मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप दिला. राजपथावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांचा साज 'खड्या आवाजातील दुर्गा देवीची आरती आशा विविध माध्यमातून आदिशक्तीला सातारा शहरातील कृत्रिम तळ्यावर भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी सातारा शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. 

सातारा जिल्ह्यात यंदा सुमारे साडेतीन हजार पेक्षा जास्त नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली होती. सातारा शहरासह जिल्ह्यात अबूतपूर्व उत्साह अनुभवायला मिळाला. पावसाचे दोन दिवस सोडले त्या शेवटच्या काही दिवसांमध्ये दांडिया गरबा नृत्यांनी शहर व उपनगरांमध्ये मोठी धूम पाहायला मिळाली मात्र पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन झाल्यापासून बहुतांश मंडळी दांडिया गरब्याचे कार्यक्रम रद्द करत ती मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वळवल्याचे वृत्त आहे.

उत्सवाचा शेवट उत्साहात करण्यासाठी सातारा शहरातील मंडळांनी नियोजन केले होते. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासूनच विसर्जन मिरवणुकीची तयारी झाली होती. सायंकाळी सहा पावणे सहा वाजता कमानी हौद ते बोल बाग या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आला. तिथून देवींच्या विसर्जन मिरवणुका टप्प्याटप्प्याने राधिका चौक मार्गे बुधवार नाक्याच्या विसर्जन तळ्याकडे निघाल्या. गोडोली येथे दगडी शाळेजवळ विसर्जन मिरवणुकीसाठी कृत्रिम तळ्याची सोय करण्यात आली होती. 

सायंकाळी पावणे सहाच्या नंतर दुर्गादेवी उत्सवांच्या मिरवणुकांना रंगत आली. दुर्गादेवी माता की जय अंबा माता की जय भवानी माता की जय असा अखंड जयघोष यावेळी कानावर येत होता. गुलाबाची फुलांच्या पाकळ्यांची उधळण आणि आकर्षक सजावटीसह आदिशक्ती दुर्गादेवी राजपथावर विसर्जनासाठी दाखल झाल्या. सातारकरांनी या विसर्जन सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. बुधवार नाका येथील विसर्जन तळ्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. 

सातारा शहरात सुमारे दहा ठिकाणी निर्मल्य व्यवस्थेची सोय करण्यात आली होती.गोडोली येथील कृत्रिम तळ्यावर 24 तर सातारा शहरातील बुधवार नाका येथील कृत्रिम तळ्यावर 48 अशा 72 दुर्गादेवींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातारा पालिकेचे 45 कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या उपस्थितीचा आणि येथील व्यवस्थेचा आढावा बांधकाम विभागाचे अभियंता प्रतीक वैराट आणि दिलीप चिद्रे यांनी घेतला. पहाटे पावणे सहा वाजेपर्यंत दुर्गा देवी उत्सव सोहळा सुरू होता हा सोहळा यंदा 12 तास रंगला. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही पारंपारिक वाद्यांचा वापर,दोन मंडळांमध्ये ठेवलेले समांतर आंतर तसेच कार्यकर्त्यांनी दाखवलेली स्वयंशिस्त यामुळे कोठेही गर्दीचा ताण जाणवला नाही. सातारा शहर पोलिसांनी सुद्धा या सोहळ्याला बंदोबस्त देऊन सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात दोन राज्य विक्रीकर निरीक्षक 20 हजाराची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई
पुढील बातमी
महसुली दर्जासाठी सदाशिवगड ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन ; प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप

संबंधित बातम्या