10:05pm | Mar 08, 2024 |
फलटण : गेल्या 10 ते 12 वर्षांपासून बंद पडून कालबाह्य झालेल्या 33 केव्ही सोमंथळी-सुरवडी वाहिनीला मोठ्या हिमतीने उर्जित केल्याने महावितरणला फलटण शहर व लगतच्या ग्रामीण भागाला पर्यायी व समांतर वीजपुरवठा करता येणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमंथळी, बरड, आसू, वाखरी, टाकळवाडा व सासकल वीज उपकेंद्रांना 132/33/22 केव्ही कोळकी उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. हे उपकेंद्र अतिभारीत झाल्यामुळे अनेकदा आपत्कालिन परिस्थतीत नाईलाजाने भारनियमन करावे लागत होते. परिणामी नागरिकांची गैरसोय व्हायची व रोषाचा सामना वीज कर्मचाऱ्यांना करावा लागायचा. ही गैरसोय टाळण्यासाठी फलटणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, अति. कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, शाखा अभियंता सोमंथळी शेखर निकम यांनी गेल्या 12 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या 33 केव्ही सोमंथळी ते सुरवडी वाहिनीला उर्जित करण्याचे ठरवले, सुरवडी ते सोमंथळी या वाहिनीचे अंतर 15 किमी इतके आहे. अनेक वर्षांपासून वापरात नसल्यामुळे वाहिनीवर वृक्षवेलींचा विळखा झाला होता. तसेच पालखी महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी भराव टाकल्यामुळे वाहिनीची उंची कमी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी खांब बदलावे लागले. जुने इन्सुलेटर बदलून, आवश्यक तिथे तारा बदलून, लूज गाळे ओढून या वाहिनीचे पूर्ण् काम करण्यात आले आहेत. गुरुवारी दि.७ रोजी महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी वाहिनीच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, अति. कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांची उपस्थिती होती. मे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्सचे दत्तात्रय गाडे व मे. बी.एस. इलेक्ट्रिकल्सचे बाळासाहेब झगडे यांनी या वाहिनीचे काम वेळेत पूर्ण केल्याची माहिती फलटण येथील महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |