सातारा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतीमाल बाहेर काढण्याकरिता शेतरस्त्यांची आवश्यकता असतेच. त्यानुसार कराड उत्तर मतदारसंघातील सातारा, कोरेगाव, खटाव, कराड या चार तालुक्यातील तीस गावातील बेचाळीस पाणंद रस्ते मंजूर झाले असल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
कराड उत्तर मतदारसंघातील चारही तालुक्यात गावोगावी शेतीसाठी रस्त्यांचे बरेच प्रश्न अडचणीचे ठरत होते. अनेक गावांमधील शेतकऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी मागणी होती. या रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते या योजनेअंतर्गत सातत्याने पाठपुरावा करून विशेष निधी उपलब्ध करून घेतला आहे.
त्यामध्ये खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे जानुबाई मंदिर ते बागवाले वस्ती रस्ता, वडगाव जयराम स्वामी येथे चोराडे रोड ते पाटलूचा मळा रस्ता, पुसेसावळी येथे हुतात्मा स्मारक ते नारायण आप्पा चोराडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, राजाचे कुरले येथे मुख्य रस्ता ते पळाक शिवार रस्ता , गोरेगाव येथे अरविंद दत्तू शिंदे यांच्या घरापासून ते शिंदे वस्ती नांदणी पर्यंत रस्ता, चोराडे येथे नांदणी वस्ती पंढरपूर मल्हार पेठ रोड लगत श्री दत्तात्रय निकम यांच्या शेतापासून मराठी शाळा ते आबासो लोकरे यांच्या घरापर्यंत पाणंद रस्ते करणे, सातारा तालुक्यातील काशीळ येथे श्रीराम मंदिर ते खापेवाडी नदीपर्यंत, फत्त्यापू येथे लाईटचा डीपी ते कॅनॉल मार्गे भैरवनाथ मंदिर.
अतीत येथे अतीत ते सासपडे, अंगापूर तर्फ तारगाव येथे आनंदराव कृष्णा शेडगे ते धोंडेवाडी मवटी पर्यंत,माजगाव येथे पोटपाट क्र ५१ ते बंगला शेत गट नंबर ८७ पर्यंत पानंद रस्ता करणे, तसेच कराड तालुक्यातील करवडी येथे तेलकी पाणंद ईश्वर पोळ ते कराड फलटण रोड , शहापूर येथे शहापूर पाण्याची टाकी ते मसूर कॅनॉल शीव, अंतवडी येथे सुरेश शिंदे यांच्या शेड पासून ते टाकीपर्यंत, शिरवडे येथे कृष्णा नाईंगडे ते शहापूर ओढा गट नंबर ५०७ कुयाचा रस्ता, वाघेरी येथे बत्ती चौक ते ब्रिलियंट स्कूल पर्यंत , चरेगाव भवानवाडी रोड लगत पोपट पवार यांचे घर ते अनिल माने यांच्या घरापर्यंत, वडोली भिकेश्वर येथे, कालगाव येथे वाडा वस्ती नवीन गावठाण ते बेलवाडी गट नंबर ६६८ ते ८४६ पर्यंत , खराडे येथे रेल्वे गेट ते पिराचा मळा गट नंबर ४२१ ते ७६८पर्यंत, मसूर येथे जोतिबा मंदिर ते ओढ्यापर्यंत, नडशी येथे पडकी विहीर ते कृष्णा नदीपर्यंत सर्वे नंबर ६८७३ पर्यंत, कोपर्डे हवेली येते पळाक ते कोंडार रस्ता करणे, पार्ले येथे गावठाण पासून ते माणिक नगरपर्यंत, निगडी येथे निगडी गाव ते हेळगाव खिंड , मरळी येथे बेडूक माळ गावठाण ते चोरजवाडी पर्यंत,करवडी येथे शामगाव पाणंद जोतिबा वसंत सुतार ते आरफळ कॅनॉल पर्यंत, चिखली तालुका कराड येथे गट नंबर २२२ ते ४३७ पर्यंत, तासवडे येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे बामणकोट बेट कृष्णा नदीपर्यंत.
वडोली निळेश्वर तालुका कराड येथे सुंदर नगर पारले हद्दीपासून ते शहापूर हद्दीपर्यंत पाणंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर गावठाण ते वडोली निळेश्वर डोंगर पानंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर तलाव ते वडोली निळेश्वर डोंगर रस्ता करणे, वडोली निळेश्वर गावठाण ते करवडी हद्द पर्यत कोरेगाव तालुक्यामधील साप येथे डोंगर रस्ता ते भवानी माता मंदिर ते शिवाजी नारायण कदम यांच्या घरापर्यंत पाणंद रस्ते तयार करण्यासाठी निधीसह मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित गावांमधील पाणंद रस्तेही टप्प्याटप्याने पूर्णत्वास नेण्याचा मनोदय आ. मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.