सुनील माने यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी; जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा; रविवारी रहिमतपूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

by Team Satara Today | published on : 08 November 2025


रहिमतपूर  : रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

रहिमतपूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत धामणेरचे माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर व वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते संभाजीराव गायकवाड रहिमतपूर चे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांची उपस्थिती होती.

सुनील माने म्हणाले, गेली दहा ते अकरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षपदी काम करत आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंत वैयक्तिक कारणामुळे अजितदा गटात प्रवेश केला नव्हता. रहिमतपूर व परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर अजितदादा गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता रहिमतपूर येथील गांधी चौकात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून यावेळी कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांच्यासहित रहिमतपूर मधील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे .

शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व सर्व समावेशक आहे. परिसराच्या व गावच्या हिताचा विकासाचा विचार करून अजितदादा गटात प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या माध्यमातून परिसराच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्धहोऊ शकतो तसेच कार्यकर्त्यांचेही मत अजितदादांच्या गटात प्रवेश करण्याचे झाले होते यामुळे आम्ही शरदचंद्र पवार गटातून अजितदादा गटात प्रवेश करत आहे .

सुनील माने यांनी शरदचंद्र पवार गटात दिलेला राजीनामा हा शरदचंद्र पवार तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. सुनील माने यांनी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगला जनसंपर्क ठेवला होता. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील माने यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी धक्कादायक ठरणार आहे .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूच्या बिलावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
पुढील बातमी
विठोबा-बिरोबा, सिद्धनाथ देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निर्णय; भाविकांमध्ये समाधान

संबंधित बातम्या