मुस्लिम बांधवांचा सातारा शहरात भव्य जुलूस

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या ईद ए मिलादच्या शुभेच्छा

by Team Satara Today | published on : 21 September 2024


सातारा : गणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात व उत्साहात साजरा करण्या साठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आज शनिवारी 21 सप्टेंबर रोजी सातार्‍यात पैगंबर जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आज सकाळी 11 वाजता सदर बाजार येथील जामा मस्जिद येथून जुलूस काढण्यात आला.
यामध्ये बालवृद्ध सह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील या जुलूस मध्ये सामील झाले होते. त्यांनी यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. या जुलूस मध्ये पैगंबरांची असणारी मदिना मस्जिद च्या प्रतिकृतीची रॅली मधून मिरवणूक काढण्यात आली. जुलूस ची सुरुवात परिसरातील सर्व समाजाच्या नागरिकांच्या हस्ते सदर बाजार येथील जामा मस्जिद पासून, पोलीस चौकी, भारत माता चौक, कुरेशी गल्ली व त्यानंतर पुन्हा जामा मशीद पर्यंत काढण्यात आली. ईद ए मिलादच्या निमित्ताने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्वाड समिटपूर्वी अमेरिकेने लाँच केले QUAD कॉकस
पुढील बातमी
म्हाडा कार्यालयाचा वरिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

संबंधित बातम्या